भुसावळ बसस्थानक येथील घटना
बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे बस क्रमांक (एमएच-१३ सीयू ७२५७) मागे घेत असताना व त्याच वेळेस महिला महानुभव संन्यासी प्रवासी ललिताबाई प्रमोद चौधरी (७५) या जात असताना त्याच वेळेस ओबडधोबड जागेवर बसचे मागील चाक दगडावरून निसटले. त्याचा फटका ललिताबाई यांना बसला. त्या जागीच कोसळल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. महानुभाव ललिताबाई यांनी साधारण वीस वर्षांपूर्वी संन्यास घेतला होता आणि म्युनिसिपल पार्क श्रीकृष्ण मंदिरात त्या नेहमीच येत असत. त्या मंगळवारी कनाशी ता. भडगाव येथे जाणार होत्या. मात्र बसस्थानकावर दुर्घटना घडली.