पाचोरा शहरातील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – एसटी बस पाचोरा शहरात प्रवेश करत असतांना भुयारी मार्गाच्या जवळ चौकात वळण घेतांना बसचा मागील भाग रस्त्याच्या दुभाजकला धडकला. हि घटना घडल्यानंतर एसटी बस चालकाने प्रवाश्यांना बस मध्येच बसवून बस मागे पुढे घेत बस काढण्याच्या प्रयत्न केला.
दरम्यान याठिकाणी बस अडकल्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती. भुयारी पुलापासुन ते छ.संभाजी राजे चौफुलीपर्यंत अतिक्रमणात असलेली दुकाने काढली पाहिजे, जेणेकरून अतिक्रमणामुळे वाहतुकीचे प्रश्न उद्भवणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
एरंडोलकडून पाचोरा येणारी बस क्रमांक एम एच ०६ एस ८६२३ हि पाचोरा शहरातील भुयारी पुलाकडे आली असताना दुभाजकाला तिचा मागचा भाग धडकला. यामुळे चालकाला बस मागे पुढे लवकर काढता आली नाही. परिसरात वाहतूक खोळंबली होती. यावेळी बस दुभाजकास घसरल्याने आवाज आल्याने तेथील नागरिकांनी एसटी बस कडे धाव घेतली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही काहीवेळा नंतर एसटी बस चालकाने पुढे मार्गस्थ केली.
पाचोरा नगरपालिका व पोलीस प्रशासनानेदेखील कुठलीही दुर्घटनेची वाट न पाहता रस्त्यावरील भुयारी पुला पासुन ते छ.संभाजी राजे चौफुली पर्यंत अतिक्रमणात असलेल्या दुकाने हटवावे. रस्त्याच्या श्वास मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.