यावल तालुक्यातील कोळवद येथील घटना
कोळवद येथे बस स्थानक आहे. या बसस्थानकाजवळून बस घेऊन चालक वसंत उघडू नन्नवरे हे जात होते. दरम्यान बसच्या चाकाखाली बकरीचे पिलू आले. या रागातुन कोळवद गावातील सिराज बिस्मिल्ला तडवी याने सदर बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सिराज तडवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.