जळगाव (प्रतिनिधी ) ;- बारी समाज माध्यमिक व उच्च .माध्यमिक विद्यालयात दिनांक. 22/7/24 ते 28/7/24 पर्यंत” राष्ट्रीय शिक्षण” सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे सदर सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे .त्यामध्ये दिनांक 22 /7/24 रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस चंद्रकांत कुमावत यांनी साजरा केला.
तर 23/07/24रोजी मूलभूत संख्यात्मक ज्ञान व साक्षरता दिवस मनीषा पायधन यांनी घेतला. 24 /7/24 रोजी क्रीडा दिनानिमित्त क्रीडा सामने घेण्यात आले संजय काटोले यांनी क्रीडा सामने घेतले. आज दिनांक. 25/7/24. रोजी सांस्कृतिक दिन निमित्त सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी या सप्ताहाचा आयोजन केले आहे. तसेच सांस्कृतिक दिनानिमित्त डिश डेकोरेशन , पथनाट्य, गीत गायन, नृत्य स्पर्धा देखील घेण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर ,पर्यवेक्षिका सुरेखा दुबे सुनील भदाणे, रामकृष्ण पाटील ,देवका पाटील , आकांक्षा निकम , मनीषा अस्वार, आशा कोळी ,घनश्याम काळे, नेत्रा वाणी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.