जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.
दिवसभर विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी भाषेत संभाषण केले. त्यानंतर हिंदी दिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख दीपक कुलकर्णी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षिका सुरेखा दुबे हे होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन आशा कोळी यांनी केले.
मुख्याध्यापक राजेंद्र आंबेडकर यांनी हिंदी भाषेविषयी मनोगत व्यक्त केले तर पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांनी हिंदी भाषेचे महत्व याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये दीपक कुलकर्णी यांनी “राष्ट्रभाषा हिंदी का महत्व” “राष्ट्रीय एकात्मता अखंडता मे हिंदी का योगदान” यावर मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे आभार मनीषा पायधन यांनी मानले. विविध स्पर्धांचे नियोजन रमा अडकमोल यांनी केले.