जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे महावाचन उत्सव उपक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे व सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी उपस्थित होते. या उपक्रमात भारती ठाकरे यांनी वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा भरवून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची महत्त्व कळावे यासाठी सर्व विद्यार्थ्याना या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले.
उपक्रमांमध्ये इयत्ता दहावीचे एकूण सहा विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा व्हिडिओ तयार केला यात, हितेश तांदळे ,सागर अस्वार, गोपाळ भवर, निलेश फुसे, तेजस बारी व चैतन्य सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच सदर महावाचन उपक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी यांनी सहकार्य केले.