जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज 15 ऑगस्ट रोजी78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . क्रीडा शिक्षक संजय काटोले यांनी परेडच्या माध्यमातून ध्वजारोहणासाठी मान्यवरांना आमंत्रित केले.या प्रसंगी जेष्ठ सदस्य रामदास बारी, यादराव बारी, सचिव- सुरेश अस्वार ,सदस्य रामकृष्ण धनगर ,अर्जुन काटोले, विष्णू बारी ,रघुनाथ फुसे शालेय समितीचे सदस्य- निलेश खलसे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर , प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल बारी ,पर्यवेक्षिका- सुरेखा दुबे ,जेष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, चंद्रकांत कुमावत, दीपक कुलकर्णी, ज्येष्ठ लिपिक संभाजी आस्वार, राजेंद्र खलसे आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा बाबत प्रतिज्ञा घेण्यात आली., तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून मंचावर आपले विचार प्रकट केले. त्यानंतर शिरसोली गावात वाजत गाजत व देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.