जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा घर घर तिरंगा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिरसोली–येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने दिनांक .13 व 14 ऑगस्ट रोजी तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी ,सायकल रॅली कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी 13 रोजी प्रतिज्ञा/शपथ घेतली. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी संचालक यादवराव बारी, निलेश खलसे ,प्रवीण पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर ,पर्यवेक्षिका सुरेखा दुबे सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी , मनोज बारी, घनश्याम काळे, रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, देवका पाटील ,नेत्रा वाणी मनीषा पायघन , चंद्रकांत कुमावत भरत बारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा त्याचे महत्व याबद्दल सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. घनश्याम काळे यांनी विद्यार्थ्यांना व सर्व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा घेऊन तिरंगा ध्वज घरावर लावण्याचे दुकानात आपल्या परिसरात लावण्याचे आवाहन केले .त्याचप्रमाणे दिनांक 14 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा कार्यक्रमात बारी समाज विद्यालयातून शिरसोली गावात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या रॅलीत आपला सहभाग नोंदविला .