शिरसोली (प्रतिनिधी) –बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ‘बालदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, दीपक कुलकर्णी, सुरेखा दुबे, मनीषा अस्वार, मनीषा पायघन, आणि कांचन धांडे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले, त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला.
ज्येष्ठ शिक्षक दीपक कुलकर्णी यांनी बालदिनाचे महत्त्व आणि त्यासंबंधीची माहिती विशद केली. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषणात बालकांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचा समारोप केला.
सूत्रसंचालन व आभार: कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा पायघन यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी कांचन धांडे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली, तर कार्यक्रमाचे परीक्षण सुरेखा दुबे यांनी केले. शेवटी, मनीषा आस्वार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा बालदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला.








