जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
शिरसोली (वार्ताहर) :- जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज जंतनाशक दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे हे होते. तर प्रमुख अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश अग्रवाल, आरोग्य अधिकारी तेजस्विनी देशमुख ,पर्वेक्षक चंद्रशेखर महाजन, विश्राम महाजन, निर्मला सपकाळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर जंतनाशक दिनाचे कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्यांचेवाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी संदर्भात सखोल माहिती दिली तसेच स्वच्छतेचे महत्व आरोग्य ती काळजी हात धुण्याची पद्धत याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील करून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले तर आभार घनश्याम काळे यांनी मानले. प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अशोक बावस्कर, सुनील बदाने, सुनील ताडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.