शिरसोली (प्रतिनिधी) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुरेखा दुबे हे होते. तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन घनश्याम काळे यांनी केले. तर सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी वीर बाल दिवस संबंधित विद्यार्थ्यांना सविस्तर व सखोल माहिती दिली. गुरुगोविंद सिंग यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह व बाबा फत्तेह सिंह यांची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांनी अध्यक्षीय भाषण केले. नेत्रा वाणी यांनी आभार व्यक्त केले.