जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व जळगाव येथील खगोल शास्त्रज्ञ सतीश पाटील यांनी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतराळ कसे तयार झाले याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार करून आणले व अंतराळात सोडलेले विविध उपग्रहांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे उपग्रह अंतरात कसे सोडले जातात हे देखील त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून दिले. सदर कार्यक्रमाप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रकांत कुमावत यांनी केले तर आभार सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी मानले.