शिरसोली ( वार्ताहर ) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेथे १४ सप्टेंबर हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
प्रमुख अतिथी पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, हिंदी विभाग प्रमुख सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षिका आशा कोळी, मनीषा पायघन, रमा अडकमोल, प्रशांत पाठक हे उपस्थित होते. प्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत गाणी, कविता, नाट्यछटा अतिशय उत्कृष्ट सादर केल्या. पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी राष्ट्रभाषा हिंदीविषयी मनोगत व्यक्त केले. तर सुरेखा दुबे यांनी राष्ट्रभाषा हिंदी चे महत्व विशद केले. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीयभाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पायघन यांनी केले. आशा कोळी यांनी परीक्षकाचे कामकाज सांभाळले. प्रशांत पाठक यांनी आभार व्यक्त केले. विद्यालयाचे दिवसभराचे संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत झाले.