जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात कै.शंकरराव दशरथ बारी मूळ संस्थापक तथा माजी अध्यक्ष व त्यांच्या धर्मपत्नी कै.कस्तुराबाई शंकरराव बारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जी बी काळे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती दिपाली पाटील मॅडम श्रीमती कांचन धांडे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री निलेश भाऊ खलसे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे विद्यमान संचालक माजी प्रभारी मुख्याध्यापक श्री एस एस बारी होते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज बारी सर सल्लागार मा. श्री नंदकिशोर लावणे संस्थेचे संचालक मा. श्री अर्जुन काटोले, श्री शशिकांत वाणी, श्री उमाकांत बारी श्री अशोक गोकुळ बारी श्री गिरीश वराडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर प्रभारी पर्यवेक्षक श्री एस ए भदाणे सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेतील बालवाडी पासून ते बारावीपर्यंत वर्गातून प्रथम आलेले विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जसे एन एम एम एस परीक्षेत मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, गीत गायन स्पर्धा यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच शाळेतील शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे सल्लागार माननीय श्री नंदकिशोर लावणे यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या विविध कला गुणदर्शन अंतर्गत विद्यार्थ्यांना कौतुकास्पद बक्षीस दिले गेले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे विद्यमान संचालक श्री एस एस बारी यांनी आपल्या मनोगतातून त्यांचे वडील कै. शंकरराव दशरथ बारी यांच्या स्वप्नातील विचार शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगितला शाळेची स्थापना कधी झाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल स्वर्गीय बाबांचे स्वप्न आपल्या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर अधिकारी वर्ग तयार होणे. तसेच गावाचे शाळेचे नाव लौकिक होणे त्याचबरोबर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सरांनी कौतुक केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ एन ए अकोले मॅडम यांनी केले.









