जुन्या आठवणींना दिला उजाळा
शिरसोली (वार्ताहर) : येथील बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सन २००५ मधील माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन घेतले. यावेळी ओळख परिचय घेऊन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी आर. के. पाटील, एल. एच बारी, एस. पी. पाटील, एस.एस. बारी, दीपक कुलकर्णी, एल. एच. चौधरी, पी. एल. काटोले, एच. जे. बारी, एम. एच. पाटील, कडू येवतकर, देविका पाटील, के. पी. पाटील हे शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रशांत काटोले, अमोल पाटील, निलेश कोल्हे, प्रवीण बारी, हेमंत पाटील, अशोक पाटील, श्रीकांत बारी, मुकेश पाटील, प्रदीप बारी, अश्विनी पाटील, ज्योत्स्ना बारी, देवका तांदळे, सपना बारी, सरला शिंपी, समाधान ठाकूर, निलेश पवार यांनी परिश्रम घेतले.