जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विद्यार्थ्यांना प्राविण्य
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९१. १५ टक्के लागला आहे. शाळेतून प्रथम येण्याचा मान करिश्मा दिपक बारी ९२.८० या विद्यार्थिनीने पटकावला तर द्वितीय क्रमांक संयुक्तपणे दिवेश संतोष सूर्यवंशी व स्नेहल वासुदेव जगताप ९२. ६० तृतीय सुमित ज्ञानेश्वर अस्वार, हर्षदा शिवदास नेटके ९० टक्के व रोहित कैलास पाटील ८९.८० या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
शाळेतून २२६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी २०६ उत्तीर्ण झाले असून ६८ विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मिळवले.शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष अशोक तोताराम बारी, उपाध्यक्ष दिलीप बारी ,सचिव सुरेश अस्वार, शालेय समिती चेअरमन कमलाकर तांदळे, संचालक अर्जुन काटोले, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.