जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते .
तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका सुरेखा दुबे ,ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारती ठाकरे व रमा अडकमोल यांनी विद्यार्थ्यांकडून विविध वाचनीय पुस्तक वाचनाचे आयोजन केले. त्यानंतर मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व दीपक कुलकर्णी यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवका पाटील यांनी केले. सूत्रसंचालन घनश्याम काळे व मनीषा पायघन यांनी केले. आभार नेत्रा वाणी यांनी मानले.