जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली -बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आज आर .ओ. वॉटर फिल्टर चे उद्घाटन करण्यात आले. शिरसोली येथील उद्योजक के .सी. पाटील व अरुण पाटील यांच्यातर्फे विद्यालयाला सुमारे दोन हजार लिटर क्षमतेचे आर ओ वॉटर सिस्टम बसविण्यात आले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार हे होते .प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बारी, शालेय शिक्षण समितीचे सदस्य, निलेश खलसे, संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, सदस्य रामकृष्ण धनगर ,रघुनाथ फुसे ,यादव बारी , प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत अर्जुन काटोले यांच्या हस्ते व चेअरमन अशोक अस्वार यांनी फित कापून उद्घाटन केले. सदरच्या आरो सिस्टीम लावण्यात संस्थेचे सदस्य अर्जुन काटोले व विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुनील भदाणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले . प्रसंगी विद्यालयातील जेष्ठ लिपिक संभाजी अस्वार ,राजेंद्र खलसे ,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार घनश्याम काळे यांनी मानले.