रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापाऱ्यांची बैठक
रावेर (प्रतिनिधी) : नवीन तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. व्हीसीच्या माध्यमातून केळी क्षेत्र असलेल्या बाजार समितीनी बैठक घ्यावी. त्यात केळीचे भाव निश्चित करताना जळगाव जिल्हा व ब-हाणपूर समित्यांनी समन्वय साधावा. व्यापायांची बैंक हमी घेऊन परवाना द्यावा. तसेच बोगस व्यापा-यांवर समित्यांनी कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केल्या.

रावेरातील माजी सैनिक हॉलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने केळी लिलाव सुरू, भावातील तफावत, स्थिर भाव याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांची बैठक झाली. दरम्यान, बैठकीत केळी लिलावासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. व्यासपीठावर सहायक पोलीस अधीक्षक अनपूर्णा सिंह, कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, ब-हाणपूर बाजार समितीचे हितेंद्र सिकलवार, रावेर सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी केळी पिकाबाबत शेतकरी व व्यापारी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. केळी पीक पद्धत चक्राकार पद्धतीने लावावीत. यासाठी तीन, चार वर्ष संघर्ष करावा लागेल. केळी पीक सिंगल प्रॉडक्ट न ठेवता विशेषतः मल्टी प्रॉडक्ट करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, रावेर सह जिल्ह्यातीत केळी क्षेत्र असलेल्या बाजार समिती व कहाणपूर बाजार समिती मिळून केळी भाव एक राहिल यासाठी समन्वय ठेवावा. सर्व व्यापाऱ्यांचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे. त्यासाठी बँक हमी महत्वपूर्ण आहे. बोगस व्यापारी शोधून समित्यांनी अशा व्यापायांवर कठोर कारवाई करावी तसेच तीन किलो कुट्टीचा निर्णय समन्वयाने सोडवावा, व्यापारी व शेतकरी यांच्यात स्पर्धेचे वातावरण नसावे, दोघांनाही एकमेकाची गरज आहे, केळीचे भाव वाढण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीने नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
व्यापाऱ्यांच्या त्याबद्दल असलेल्या पेमेंट पध्दतीबाबत माहिती दिली. या बाबत बाजार समितीने बैंक अरेंजमेंट करावे, यासह पाणंद रस्ते तक्रारीसाठी हेल्प लाईन सुरू करावी. माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, कृउबा संचालक प्रत्त प्रल्हाद पाटील, पितांबर पाटील, योगीराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, प्रणित महाजन, सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी, व्यापारी यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व्यापारी संजय अग्रवाल, नितीन पार्टील, संतोष पाटील, रमेश वैदकर, विनोद पाटील, बाजार समिती संचालक डॉ. राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुथटे, मंदार पाटील, संय्यद असगर यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सभापती सचिन पाटील तर सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले.
अरविंद गांधी म्हणाले की, एक बिल पद्धत लागू करावी. सुरेश धनके यांनी लिलाव पद्धत सुरू करण्याची मागणी केली तर राजीव पाटील यांनी ८० टक्के व्यापारी बोगस आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा व परवाना देतांना समितीने बँक गॅरेटी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.









