सकल हिंदू समाजातर्फे पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाची भूमिका ठरवणेसाठी आज शुक्रवारी दि. ९ रोजी सकल हिंदू समाजाने एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली. त्यानुसार शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रपरिषेदेत माहिती दिली.
बांगलादेश येथे अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याबाबतचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती देऊन जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, या प्रकरणी एक माणूस म्हणून आपण जळगाव जिल्हा हा दि. १६ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार आहोत. याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत. तसेच, केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी.
तसेच, वक्फ बोर्डाविषयी केंद्र सरकार कायदा आणत आहे. याबाबत आम्ही हिंदू समाजातर्फे आभारी आहे. कडकडीत बंद पळताना जिल्ह्यातील वातावरण खराब होणार नाही, चुकीचे फलक लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कार्यकर्त्यांना जनार्दन हरी महाराज यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला
महानुभाव शास्त्रीजी, शाम चैतन्य महाराज, अनंत प्रकाश, कोठारीजी, ललित चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.