जळगाव महानगरपालिकेची मोहीम सुरु
जळगाव (प्रतिनिधी) :- प्लास्टिकबंदीविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी २८ डिसेंबर रोजी ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी तसेच इतर बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅग वापरणाऱ्या दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्लास्टीक कॅरी बॅग उत्पादनासह विक्रीला बंदी आहे. जुने जळगाव भागातील विठ्ठल पेठ व का.ऊ. कोल्हे विद्यालयाजवळ पाच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहे. किशोर एकनाथ पाटील (रा.विठ्ठल पेठ, जळगांव) व राहूल सिंग (रा.का.ऊ.कोल्हे शाळा परिसर) या दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या पथकातील मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश इंगळे, मुकादम दिपक भावसार, वालीदास सोनवणे व शरद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोहीम राबविली.