१५० कामगारांनी घेतला लाभ

मात्र, पाचोरा शहरातील कामगारांची वाढती नोंदणी संख्या लक्षात घेता, दोन ते तीन दिवसांत सर्वांना नोंदणी करून किट वाटप करणे शक्य नव्हते. यामुळे आ. किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार, आता प्रभागनिहाय नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन धोरणांतर्गत, प्रभाग क्रमांक ८ मध्ये बुधवार, २९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, शिवतीर्थ, जय किसान कॉलनी, पाचोरा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला महिला बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पूर्वी वरखेडी येथे नोंदणी करताना मोठ्या गर्दीमुळे आणि काही तणावपूर्ण घटनांमुळे नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, प्रभागनिहाय नोंदणीच्या या नव्या निर्णयामुळे पाचोरा शहरात शिबिरे अधिक व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडत आहेत.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सागर बंडू सोनार, दिलीप परदेशी, केशव शेलार आणि भूषण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आ. किशोर पाटील यांच्या सौजन्याने आणि सुनीता पाटील, महेश प्रकाश सोमवंशी तसेच जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.