रावेर ( प्रतिनिधी ) – शहरातील स्टेशन रोडवरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून ३० हजार रुपयांची रोकड लांबविली रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय भरतलाल जयस्वाल (वय-३१, रा. भागीरथी नगर, अकोला ह.मु. रेल्वे स्टेशनरोड रावेर ) हे युनियन बँकेत नोकरीला आहे. १३ नोव्हेंबर दुपारी ३ ते १५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातून ३० हजार रुपयांची रोकड लांबविली अक्षय जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना महेंद्र सुरवाडे करीत आहे.