जळगाव शहरात संभाजीनगर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बंद घरातून चोरट्याने सुमारे ६२ हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. महाबळ परिसरातील संभाजीनगरात ही घटना बुधवार, १ रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अरुण जगन्नाथ सांगवीकर (वय ६५.रा. पांडूरंग सोसायटी, संभाजीनगर) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. खासगी नोकरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २० रोजी रात्री दहा वाजता दरवाजाला कुलूप लावून ते घराबाहेर पडले. ही संधी हेरत चोरट्यांनी ही संधी हेरत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात किमती वस्तूचा शोध घेताना सामान अस्तव्यस्त केला. कपाटातील सामान विस्कळीत केला. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या घरातील चांदीच्या वस्तू चोरट्यांच्या हाती लागल्या. त्यात चांदीचा ग्लास, लक्ष्मीचा चांदीचा शिक्का, चांदीचा छन्ना, चांदीचे पैजंन, चांदीचे जोड, चांदीची वाटी, चांदीचा दिवा, चार ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा झुमका, चार हजाराची रोकड असा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले.
ही घटना बुधवार, १ रोजी उघडकीस आली. त्यानंतर अरुण सांगवीकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रकार सांगितला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी पोलिसांनी जावून पाहणी केली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जितेंद्र राजपूत करीत आहेत.