जळगावातील इंद्रनील सोसायटीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील इंद्रनील सोसायटीमध्ये बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजारांची रोकड असा ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी १३ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजित रूपसिंग पाटील (वय-५५, रा.इंद्रनील सोसायटी, जळगाव) हे खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करत असतात. दि. ११ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान घर बंद असताना अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ५७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आली आहे.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुजित पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दहा घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सफारी करीत आहे. चोरट्यांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.