जळगाव तालुक्यात नशिराबाद येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील नशिराबाद गावातील द्वारका नगर येथे राहणाऱ्या एकाचे उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने १२ हजारची रोकड, टीव्ही, मोबाईल आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान ही घटना समोर आले आहे. या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

रवींद्र रामदास चौधरी (वय ५७ रा. खालची आळी, नशिराबाद) यांच्या घरात घटना घडली. दिनांक ११ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचे घर उघडे असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात ठेवलेली रोख रक्कम, टीव्ही, मोबाईल आणि मंगळसूत्राचा एकूण ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर रवींद्र चौधरी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे करत आहे.









