पाचोरा शहरात पोलिसांची धडक मोहीम
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नवकार प्लाजा येथे एका बंद कॉफीशॉप मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी कॉफीशॉप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील नवकार प्लाजा येथे एक बंद असलेले कॉफीशॉप आहे. या कॉफीशॉप मध्ये कुठलेही पेय अथवा खाद्यपदार्थ विकले जात नाही. तसेच कॉफीशॉपचा परवाना देखील नाही.(केसीएन)असे असताना मात्र तेथे संशयित आरोपी समाधान संजय भोई (वय २३, रा. बहिरम नगर, पाचोरा) याने काही तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी ४ कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले होते. त्याने हा गाळा अजयसिंग राजपूत (रा. भडगाव) यांचेकडून भाडेतत्वावर घेतला आहे. याबाबतची कुणकुण पाचोरा पोलीस स्टेशनला लागताच त्यांनी मंगळवारी दि. २५ रोजी सकाळी साडे अकरा वाजता धाड टाकली.
पोलिसांनी पाहणी केली असता तेथे ४ कंपार्टमेंट येथे लाकडी टेबल, खुर्च्या टाकून व कापडी पडदे लावलेल्या स्थितीत दिसले. तेथे काही प्रेमी युगुल व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्लील चाळे करताना आढळून आले. मुलामुलींना समज देत सोडून देण्यात आले. पडदे, खुर्च्या अशा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(केसीएन)सदरची कारवाई निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ राहुल शिंपी, संदीप राजपूत, उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी केली. तर कॉफीशॉप चालक समाधान संजय भोई या इसमाविरुद्ध कॉन्स्टेबल सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली कॉ. राहुल शिंपी करीत आहेत.