चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : बामोशी बाबांच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या मालेगाव येथील तिघांच्या टोळीला शहर पोलिसांनी पकडले. यावेळी एका चोरट्याने भाविकाला चाकूचा धाक दाखवला. या चोरट्यांकडून ६५ हजार १०० रुपये किमतीचे ५ मोबाइल व धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे.
उंबरखेड येथील मोसीन शेख भिकन शेख हे दि. १७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दर्गा येथे दर्शनासाठी गेले. पाकिंगजवळ गर्दी असल्याने या गर्दीचा फायदा घेऊन एकाने मोसीन शेख यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालत असल्याचे लक्षात आले. शेख यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चाकुचा धाक दाखवला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास करून तिघांना अटक केली आहे.