भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बांबरुड प्र.ब ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती निंबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संगीता माळी यांनी राजीनामा दिल्याने ते पद काही दिवसापासून रिक्त होते अखेर त्या पदाचा बिगुल वाजला आणि ज्योती पाटील यांची सर्वानुमते सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शेजवळकर यांनी कामकाज पाहिले. या कामी ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक लोणीया यांनी सहकार्य केले. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य गौतम देवरे, बारकु भिल, चंदाबाई सिंग परदेशी, शकुंतला प्रकाश परदेशी, मीना मोरे, रत्नाबाई परदेशी, मालताबाई परदेशी यांचेसह राजेंद्र परदेशी, रमेश पाटील, अशोक पाटील, विनोद परदेशी, वाल्मीक पाटील, रावसाहेब पाटील, रतन परदेशी, समाधान पाटील, दगडू परदेशी यांनी नवनिर्वाचित सरपंच ज्योती निंबा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सरपंच ज्योती पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचे आभार मानले.