मुंबई (प्रतिनिधी ) –महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्या सोडविण्या साठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घ्यावी त्यासाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती चे अध्यक्ष मा. शशांक राव यांनी राज्यातील सर्व रिक्षा युनियन ,संघटना यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ यांच्या मार्फत परिवहन विभागाकडे निवेदने सादर करावी असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यासह उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्याच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा व भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी तर्फे आरटीओ यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले . शशांक राव यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे साहेब यांनी शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली
विलास भालेकर , बाबा कांबळे , नरेंद्र गायकवाड , मारोती कोंडे , गफार नदाफ , प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वात
०९ रोजी मुंबई येथे परिवहन आयुक्त यांचे कार्यालय येथे महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा संघटना पदाधिकार्यांची मिटींग आयोजित करण्यात आली.
या महत्वपूर्ण बैठकीत ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे अतिरिक्त आयुक्त मा. राजेंद्र पाटील , देशपांडे ,राजेंद्र मदने तसेच रिक्षा संघटना प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या वेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले मा. परिवहन आयुक्त साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चेतील मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले
या बैठकीत उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती चे माजी उपाध्यक्ष
प्रल्हाद सोनवणे तसेच भाजपा जळगाव महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी जळगाव जिल्हा व जळगाव महानगरातील सर्व रिक्षा चालक मालकांच्या मागण्यांबाबत परिवहन आयुक्त साहेब यांच्या कडे निवेदने देऊन गाऱ्हाणे मांडले या राज्यव्यापी मिटींग ला मुंबई रिक्षा टॅक्सी मेन्स चे अध्यक्ष मा. शशांक जी राव , जेष्ठ मार्गदर्शक मा. शंकर जी साळवी विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष मा. विलास जी भालेकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे अध्यक्ष मा. बाबा कांबळे , नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्ह्यध्यक्ष मा. प्रल्हाद भाऊ सोनवणे भाजपा जळगाव महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद वाणी नवि मुंबई ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कॄती समिती चे अध्यक्ष मा. मारोती कोंडे , कॄष्णा कराड रिक्षा संघटनचे अध्यक्ष मा. गफार नदाफ टायगर ऑटो रिक्षा संघटना नांदेड अध्यक्ष मा. अहमद बाबा बागवाले, अकोला जिल्हा ऑटो रिक्षा चालक श्रमिक संघटना अध्यक्ष इतिहास खान लोधी शिव गर्जना रिक्षा संघटना सांगली अध्यक्ष सुरज मुल्ला , टायगर ऑटो रिक्षा संघटना नागपूर चे अध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रहित ऑटो रिक्षा संघटनचे अध्यक्ष नरेंद्र वाघमारे , संतोष शर्मा , शाकीर खान , मुश्तकिन खान , रिपाइं वाहतूक संघटना चे अध्यक्ष विलास गायकवाड , रैयत ऑटो रिक्षा संघटना चे अध्यक्ष राहुल वारे , औरंगाबाद ऑटो रिक्षा संयुक्त कॄती समिती चे सचिव इमरान पठाण, भाजपा रिक्षा संघटना मार्गदर्शक मा. मल्हारी गायकवाड राजू इंगळे, जावेद पठाण, विजय पाटील , फिरोज मुल्ला , सुनील बोर्डे , शिवाजी गोरे , महिपती पवार , राहूल कांबळे , सुरेश गलांडे, रामभाऊ पाटील, आरिफ पठाण, आशिष देशपांडे, आबा बाबर प्रदीप भालेराव, बाप्पू धुमाळ, रहीम पटेल, सदाशिव तळेकर, विनोद वरखेडे , प्रकाश यशवते यांच्या सह महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा युनियन संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते
मुक्त रिक्षा परवाने देणे बंद करावे , रिक्षा चालक मालकांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणारे कल्याण कारी महामंडळ परिवहन खात्या अंतर्गत व्हावे , खाजगी बेकायदेशीर वाहतूक बंद करावी जळगाव जिल्हा व महानगरासह महाराष्ट्रातील इतर ठिकाणी नव्याने रिक्षा स्टँड ला मंजुरी देण्यात यावी , लाकडाऊन काळात आर्थिक संकट आलेल्या रिक्षा चालकांना दहा हजार रुपये मदत द्यावी , लाकडाउन काळातील रिक्षा वरील बॅंकेचे , फायनान्स कंपनीचे कर्ज व त्यावरील व्याज माफ करावे विविध फायनान्स कंपनीच्या वतीने बेकायदेशीरपणे मुजोरपणाणे करीत असलेली हप्ते कर्ज वसुली बंद करावी थकीत कर्ज वसुलीच्या नावाखाली रिक्षा जप्त करणे बंद करावे
तसेच आरटीओ चे विविध कर , दंड माफ करावे , प्रत्येक जिल्ह्यातील RTO साहेबांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रिक्षा चालक मालकांच्या अडीअडचणी सोडविण्या संदर्भात बैठका घेण्यात याव्या यासह विविध मागण्यांबाबत राज्याचे परिवहन आयुक्त साहेब यांच्या मुंबई येथील कार्यालयात रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली