आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पुजन
नांद्रा (ता.पाचोरा) – ता.६आज सकाळी ११ वाजता बहूळा धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सह कार्यकर्ते यांच्या हस्ते पुजन करून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले यावेळी उपविभागीय अभियंता एन.बी.शेवाळे,शाखा अभियंता के.बी.देशमुख सहायक अभियंता बहुळा मध्यम प्रकल्प , जि.प.सदस्य पदमबापु पाटील,माजी सभापती पंढरीनाथ पाटील, लासगाव सरपंच समाधान पाटील, नांद्रा माजी सरपंच सुभाष तावडे,वेरुळी विजय पाटील,किरण पाटील हडसन, लासगाव राजेंद्र तायडे, लासगाव सुनील पाटील, विलास पाटील, संजय पाटील खेडगाव, लासगाव माजी सरपंच गोपाल पाटील , नांद्रा माजी सरपंच विनोद तावडे, सामाजिक कार्यकर्ते धर्मा बाबुलाल भिल्ल,अवि पाटील, प्रकाश परदेशी, विलास पाटील सरपंच वेरुळी, उपसरपंच अनिल पाटील , एकनाथ अहिरे वेरूळी, किशोर अहिरे , अक्षय जैस्वाल लोहारा,संदीप पाटील खेडगाव यांच्या सह असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतीसाठी रब्बी हंगामात या बहूळा धरणातून दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे.प्रत्येकी दोन हजार क्विस्सेस एवढे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.
कापूस पिकावर बोंळ आळी पडल्यामुळे सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस काढून रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी,दादर,मका,हरबर या पिकांची कोरडवाहू शेतकऱ्यांनी रब्बी चार पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांना या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.
कापूस पिकावर बोंळ आळी पडल्यामुळे सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस काढून रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी,दादर,मका,हरबर या पिकांची कोरडवाहू शेतकऱ्यांनी रब्बी चार पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांना या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.
उपविभागीय अभियंता एन.बी.शेवाळे यांना मतदारसंघातील धरणांमधील जलसाठा शेती पिकांसाठी पाणी, शेतकऱ्यांना सुद्धा त्रास न होऊ देता व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्या साठी च्या सुचना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिल्या.
फोटो ओळ………………. वेरुळी (ता.पाचोरा) येथील बहूळा धरणातून रब्बी शेतीसाठीपहिल्या आवर्तन सोडण्या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, पदमबापु पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, सुभाष तावडे आदी.