अज्ञाताने बनवले फेक व्हाटसअप खाते
जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच, कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावे एका मोबाइल क्रमांकावरून बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्यावर प्रा. माहेश्वरी यांचा फोटो आहे. वास्तविक हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेश आल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये, असे आवाहन विद्यापीठाने निवेदनाद्वारे केले आहे. याबाबतीत सायबर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला आहे.