संदीप दिवे विजेता तर योगेश धोंगडे उपविजेता
जळगाव (क्रीडा प्रतिनिधी):- स्व. सीताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष एकेरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत संदीप दिवे (जैन इरिगेशन) याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात संदीप दिवेने योगेश धोंगडे (जैन इरिगेशन) याला २-१ अशा सेटने पराभूत करत रोख चार हजार रुपये आणि चषकाचा मानकरी ठरला. उपविजेत्या योगेश धोंगडेला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले गेले. झालेल्या या सामन्यात तिसऱ्या स्थानाकरीचाच्या लढतीत रईस शेख (तमन्ना) याने नईम अन्सारी वर सहज विजय मिळवला. शोएब मोमीन, अय्युब खान, अयाज शेख आणि शेख हबीब यांनी देखील ५ ते ८ वे स्थान मिळवत पारितोषिके प्राप्त केली. रोहन बाहेती यांच्या प्रायोजकत्वाने झालेल्या या स्पर्धेला झेनिथ टूल्स व मशिनरी, पेंट पॉईंट, लिसर स्पोर्टस् हाऊस, गणेश इंटरप्राइजेस, सबा कन्स्ट्रक्शन व झेड. एम. स्पोर्ट्स तर्फे प्रोत्साहनपर टी-शर्ट दिले गेले. स्पर्धा आयोजनात जळगाव जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, राज्य कॅरम असो.चे मंझूर खान, सय्यद मोहसिन यांच्यासह फिरोज खान, अजीज शेख, नईम अन्सारी, सैय्यद जुबेर, रईस शेख, सैय्यद मुबश्शीर व अफझल शेख यांचे मोलाचे योगदान राहिले. कय्युम खान यांच्यासह सरफराजुल हक, संतोष हायलिंगे, यश धोंगडे, सैय्यद युसुफ, बिलाल रंगरेज, अवेस अन्सारी, साकिब अन्सारी, जैद शेख , जाहिद खान, एजाज अन्सारी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
छायाचित्र: डावीकडून – स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमांकाच्या खेळाडूंसमवेत डावी कडून कय्युम खान, सलीम अन्सारी, रोहन बाहेती, शेख हबीब, सैय्यद मोहसिन व मंजूर खान.