जळगाव ( प्रतिनिधी ) – इन्टाग्रामवर आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याने बदनामी होईल म्हणून रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरुन पलायन गेले आहे. रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला आहे
रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे तिच इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले. त्यामुळे बदनामी होईल या भितीने अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारी घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी पुन्हा परत आली नाही. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशयसुध्दा मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख हे करीत आहेत.