जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे राज्यभरातील गट अ, उपमुख्य कार्यकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी निघाले आहेत. यात अमळनेर येथील गटविकास अधिकारी विशाल कालिदास शिंदे यांची पंचायत समिती, खेड, जि. पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रुजू व्हावे. पदभार स्वीकारल्याची माहिती शासनाला कळवावी, असे परिपत्रकात अवर सचिव उर्मिला जोशी यांनी म्हटले आहे.