जळगाव (प्रतिनिधी ) ;- बदलापूर येथे चार वर्षीय दोन लहान मुलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध व्यत्क्त करण्यात येत आहे. जळगावातील टॉवर चौकात सिग्नलवर लहान मुलींनी फलकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी करणारे फलक झळकावून आपला निषेध व्यत्क्त केला
वैशाली योगेश साळी ,मोक्षदा योगेश साळी ,राजश्री वसंत तुळसकर या विद्यार्थिनींनी बदलापूर येथील बालिका अत्याचार विरोधात जळगांव येथील टॉवर चौक येथे फलक घेऊन उभे राहिले. यावेळी जळगावकरांचे यामुले लक्ष वेधून घेतले.