बदलापूर (वृत्तसंस्था ) ;- येथील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना असून त्यामुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.मात्र या बंद दरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने तीन ते चार पोलीस जखमी झाले आहेत.
बदलापुरातील शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बदलापुरात जमलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत
बदलापूर रेल्वे स्थानकात मागच्या काही तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. त्यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे.
वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात तीन ते चार पोलीस जखमी झाले.