शालेय शिक्षण विभागाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या बदलीचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागतर्फे मंगळवारी १ ऑगस्ट रोजी निघाले. त्यांची नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) च्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री ताराचंद पाटील यांची धुळे येथे त्याच पदावर बदली झाली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे मंगळवारी गट अ व गट ब च्या काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले. यात नितीन पोपटराव बच्छाव यांची विनंतीने बदली झाली आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा मधील गट अ मधून जयश्री पाटील यांचीही विनंती बदली झाली आहे. याशिवाय मदन विश्वनाथ मोरे यांची मालेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावरून मुक्ताईनगर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परिपत्रकावर अवर सचिव विजय भोसले यांची सही आहे.