जळगाव (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने वाळूची भरलेली विनानंबर प्लेटची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे. या ट्रॅक्टर ट्रॉली चालकाने कुठलीच रॉयल्टी भरली नसल्याचे दिसून आले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे गस्तीवर होते. बुधवारी ३० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर ट्रॉली नंबर प्लेट नसल्यामुळे अडविली. त्यात वाळू व त्यावर दगड अंथरलेले होते. ट्रॅक्टर चालक गणेश अशोक कुंभार ( वय २३) रा. पाळधी ता. धरणगाव याला कायदेशीर रॉयल्टी भरली आहे का विचारले. मात्र त्याने रॉयल्टी भरली नसल्याचे सांगितले. त्याने ट्रॅक्टर मालकाचे नाव सलमान दगडू शेख रा. पाळधी असे सांगितले आहे. त्यामुळे हि ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली आहे. तसेच तालुका न्यायदंडाधिकारी याना कारवाई होणेबाबत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे.