यावल तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील ६ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने गोड बोलून घरात नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला रात्री ९ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. एका गावात सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान नराधमाने पीडित बालिकेला अंगणात खेळत असताना गोड बोलून त्याच्या घरात बोलावून घेतले. त्यानंतर घरात नेत तिच्यावर बलात्कार केला. नंतर बालिकेने आईला घटना सांगितल्यावरून नराधम रज्जाक नसीर तडवी याच्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.