जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १४ जानेवारी रोजी दुपारी चिमुकली ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी परमानंद कन्हैय्या गोरे रा. गुलई जि. खंडवा ह.मु. जि. जळगाव याने खेळण्याच्या बहाण्याने बोलवून एकांतात तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी यांच्यावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे करीत आहे.