जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दूध फेडरेशन परिसरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीशी इंस्टाग्रामवर ओळख निर्माण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता एकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दूध फेडरेशन परिसरातील एका भागात २३ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जुलै २०२३ मध्ये या तरुणीची इंस्टाग्रामवरून विकी गुलाब सोनवणे (रा. आसोदा रोड) याच्याशी ओळख निर्माण झाली. इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत विकी सोनवणे यांनी पीडित तरुणीला वेगवेगळ्या गावाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान या प्रकरणी तरुणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता संशय आरोपी विकी सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.