नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला आहे. मृत मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर, पोलीस पथक तरुणीचा मृतदेह घटनास्थळावरून घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी कुटुंबातील काही लोक पोलिसांच्या पाठीमागे धावताना दिसत आहेत.