भडगाव शहरात केली होती १० लाखांची घरफोडी
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील एका घरफोडी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या संशयित आरोपीचा सहा महिन्यानंतर तपास लागला असून त्याला वर्धा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. हा संशयित आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारा असून त्याने छत्तीसगड येथून मुद्देमाल काढून दिला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकात ५४ घरफोड्या केल्याचे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९, रा. विद्यानगर, भडगाव) हे घरी नसतांना दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायकांळी ०५.४५ ते ०७.१५ वाजेच्या दरम्यान त्यांचे राहते घराचे वरच्या मजल्यावरील जिन्याचे लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. घरातील बेडरुम मधील कपाटाचे लाँक तोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम मिळुन एकूण १० लाख ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. म्हणुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास हा पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांचे कडेस देण्यात आला होता.
तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकाँ किरण रवींद्र पाटील, पोकाँ प्रवीण कडु परदेशी, पोकाँ संदिप भटु सोनवणे यांनी तांत्रीक विश्षलेषनाच्या आधारे तपास करुन सदर गुन्ह्याचा तपासात प्रशांत काशिनाथ करोशी (वय ३८, रा. मौजे इस्पुर्ली ता. करवीर, जि. कोल्हापुर) यांने चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास वर्धा ता. जि. वर्धा येथुन ताब्यात घेण्यात आले.
विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करुन नेलेल्या सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम पैकी १२० ग्रॅम सोने एकुण ८ लाख ६४ हजार रुपयांचे काढुन दिल्याने ते रायपुर (छत्तीसगड) येथुन जप्त करण्यात आलेले आहे. संशयीत आरोपी यास दिनांक २५ जून रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास ०७ दिवासांची पोलीस कस्टडी दिली आहे.
यातील सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा असुन त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सुमारे ५४ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, पो.हे.काँ. किरण रवींद्र पाटील, पो.काँ. प्रवीण परदेशी, पोकाँ संदिप सोनवणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.