जळगाव शहरातील अजिंठा चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या तरूणाने रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण भिका वाघ (वय ३० रा. सुदामा नगर, भोपाल, मध्यप्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे. भूषण वाघ हा तरूण आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत भोपाल येथील सुदामा नगरात वास्तव्याला होता. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचा व्यवसाय तो करत होता. दरम्यान, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भूषण वाघ हा कामाच्या निमित्ताने जळगावात आलेला होता. जळगावातील अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलच्या रूममध्ये राहत होता.
गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुकींग केलेल्या रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हॉटेल मालक यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.