जळगाव शहरातील दादावाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : राहत्या घरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल सुधाकर सोनवणे (१९, रा. दादावाडी) अशा मयत तरुणाचे नाव आहे. हर्षल सोनवणे हा तरुण दादावाडी परिसरात मामांकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षिका असून वडील एका खासगी कंपनीत आहे. हर्षल हा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. (केसीएन)सोमवारी तो घरी एकटाच असताना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. ही घटना शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने हर्षलला खासगी रुग्णालयात दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर हर्षलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. कुटुंब यांना माहिती समजतात त्यांनी रुग्णालयात येऊन आक्रोश केला. (केसीएन)दरम्यान उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे जळगावतील सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.