• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, वनविभागाच्या पोलिसांनी वडिलांना भेटू दिले नाही म्हणून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in क्राईम, जळगाव
0

संशयीतासह मयत मुलाला मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप

मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वन कोठडीत असलेल्या पित्याला घरी आणल्यावर सुद्धा भेटू दिले नाही म्हणून १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान वन कोठडीतील संशयीताला घरी आणून त्याच्या मुलासमक्ष त्याला व त्याच्या मुलाला देखील बेदम मारहाण वनविभागाच्या पोलिसांनी केली. त्याला भेटू दिले नाही त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच त्याच्या अंत्यसंस्काराला कोठडीत असलेल्या त्याच्या आई वडिलांना भेटू द्यावे अशी मागणी मयत मुलाच्या मोठ्या भावाने केली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240802-WA0020.mp4

सोम रहीम पवार (वय १४, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत मुलाचे नाव आहे. तो हलखेडा गावात आई-वडील, मोठा भाऊ, वहिनी, काका व इतर परिवारासोबत राहत होता. जवळच असलेल्या वडोदा गावात शिवाजी हायस्कूल येथे इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे वडील रहीम रफिक पवार आणि आई तेवाबाई रहीम पवार यांच्यासह ६ जणांना सीमाशुल्क विभागाने वाघाची कातडी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी अटक करून वन विभागाच्या ताब्यात दिले होते.(केसीएन)तेव्हापासून सर्व ६ संशयित वन विभागाच्या कोठडीत आहेत.

दरम्यान वनविभागाने शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी वन कोठडीत असलेल्या रहीम रफिक पवार यांना सोबत घेऊन त्यांचे हलखेडा गाव गाठले. मयत सोम पवार यांचे मोठे भाऊ अमीर पवार यांनी “केसरीराज”शी बोलताना माहिती दिली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वनविभागाने रहीम पवार यांच्या घरी झाडाझडती सुरू केली. (केसीएन)रहीम पवार यांना मारहाण केली. या वेळेला रहीम पवार यांचा लहान मुलगा सोम हा वडिलांना भेटू द्यावे यासाठी मागणी घालत असताना त्यालाही वन विभागाच्या पोलिसांनी तो अल्पवयीन असतानाही मारहाण केली. घरातील वस्तू फेकाफेक केल्या.

यामुळे सोम पवार याच्या बालमनावर आघात झाला. त्याने घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान सोम पवार हा खूप वेळ झाला तरी आला नाही म्हणून त्याची नातेवाईकांनी शोधाशोध केली असता पत्र्याच्या शेडमध्ये नातेवाईकांनी डोकावून पाहिले तेव्हा ही घटना कळाली.(केसीएन) या वेळेला कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

प्रसंगी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी हलखेडा गाव गाठून माहिती घेतली. दरम्यान हलखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने रहीम पवार यांच्या घराजवळ जमा झाले. सोम पवार याच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्याने लिहिले आहे की, “माझ्या बाबाला पोलिसांनी भेटू नाही दिले. म्हणून मी आत्महत्या केली.दिनांक 2/8/2024, माझे नाव : सोम रहीम पवार” असे त्याने चिठ्ठीत लिहीले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून वन विभागाच्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सोम पवार याच्या अंत्यविधीसाठी कोठडीत असलेल्या त्याच्या आई-वडिलांना अंत्यदर्शनासाठी पोलिसांनी पाठवावे अशी मागणी पवार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.(केसीएन)या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता वनविभागाचे प्रशासन दोषी पोलिसांवर काय कारवाई करते याकडे हलखेडा ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

त्याची आत्या नरेशना भोसले यांनी खबर दिल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

घरातून मोबाईल चोरणाऱ्या मुंबईच्या तरुणाला अटक

Next Post

जळगावात पुन्हा खुनी हल्ला, तरुणावर धारदार शस्त्राने पोटात गंभीर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात पुन्हा खुनी हल्ला, तरुणावर धारदार शस्त्राने पोटात गंभीर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न..!

जळगावात पुन्हा खुनी हल्ला, तरुणावर धारदार शस्त्राने पोटात गंभीर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon