जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : हात उसनवारी घेतलेल्या तसेच कर्जाच्या पैशांचा तगादा मागे लागल्यामुळे एका तरुणाने राहत्या घरी शुक्रवार दि. २६ जुलै रोजी आत्महत्या केली आहे. ही घटना अयोध्या नगर येथील एका बांधकाम साइटवर घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
ज्ञानेश्वर मदन गोपाळ (वय ३३, रा. अयोध्या नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बांधकाम प्रकल्पावर वाचमन म्हणून काम करीत असल्याने तेथेच पत्र्याच्या शेडचे घर करून ते पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. (केसीएन)वाचमन कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्यांनी काही पैसे हात उसनवारीवर घेतले होते. ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचा पैसे मागण्याचा तगादा ज्ञानेश्वर गोपाळ यांच्या मागे लागलेला होता.
त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी देखील त्याला काही जणांनी पैसे मागितल्याची माहिती मिळाली. त्या नैराश्यातून त्याने राहत्या घरात छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.