मयत अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने मामाकडे गावी गेलेला असताना नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह दि. १६ रोजी तापी नदीपात्रात तोरखेडा ता. शहाद्याजवळ आढळून आला.
उमेश कैलास सोनवणे (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. गिधाडे ता. शिरपूर येथे मामाच्या गावी तरुण गेलेला असताना मामाच्या घरातील कुटुंबाला निरोप देऊन निघालेल्या उमेशने दि. १४ रोजी रस्त्यात मुडी प्र. डांगरी येथे येत असताना सव्वाबाराच्या सुमारास गिधाडे गावाजवळ पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. तो उडी मारतांना गिधाडे येथील एका व्यक्तीने ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.
दिनांक १४ तारखेपासून तरुणाच्या घरचे कुटुंबीय त्याचा नदीपात्रात अन् गावात शोध घेत होते. तरुणाचा मृतदेह तोरखेडा शहादा येथे सापडला. त्याच्या आधार कार्डवरून सारंगखेडा पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. दि. १६ रोजी त्याचे काका शरद उत्तम सोनवणे यांनी याबाबत खबर दिल्यावरून सारंगखेडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.