भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : पतीच्या जाचाला कंटाळून शहरातील गौसिया नगरातील २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रेहाना शेख साबीर (हमीद नगर, चोपडा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी फिरदोसबी सैय्यद जावेद (२१, गौसिया नगर, आशा किराणाजवळ, भुसावळ) हिने २३ जुलै २०२४ रोजी सकाळी सात वाजेपूर्वी पती सैय्यद जावेद सै. हमीद (५०) याच्या जाच्याला कंटाळून आत्महत्या केली होती. वेळोवेळी विवाहितेला मारहाण करून गांजपाट केला जात असल्याने त्यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याने सैय्यद जावेद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.